आरक्षण नको, अॅट्रोसिटीचं संरक्षण द्या – ब्राह्मण समाजाची मागणी..

आरक्षण नको, अॅट्रोसिटीचं संरक्षण द्या – ब्राह्मण समाजाची मागणी..

‘आरक्षण नको, संरक्षण द्या’ असा नारा ब्राह्मण समाजाने दिला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ब्राह्मण समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न काही संघटनांकडून पुढे केला जात असताना ‘ब्राह्मण समाजाला आरक्षण नको आहे तर अॅट्रॉसिटी कायद्याचे संरक्षण देण्यात यावं’, अशी मागणी माढा येथे झालेल्या ब्राह्मण अधिवेशनात करण्यात आली आहे.

माढा येथे ब्राह्मण समाज सेवा संघाने तालुक्यातील ब्राह्मण समाजाच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

या मेळाव्यात पुन्हा एकदा ब्राह्मण समाजासाठी अॅट्रॉसिटी कायद्याच्या संरक्षणाचा मुद्दा समोर आला आहे.

‘आम्हाला आरक्षण नको पण अॅट्रॉसिटी कायद्याचे संरक्षण द्या’, अशी मागणी आता ब्राह्मण समाजाने मेळाव्यात केली.

यासाठी महाराष्ट्र प्रदेश ब्राह्मण परिषदेने या प्रश्नावर ब्राह्मण समाज जागृतीचे अभियान हाती घेतले असल्याचे परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष प्रा.मोहिनीताई पत्की यांनी सांगितले. यासोबतच समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ आणि राज्यातील पुरोहितांना 5 हजार रुपये मानधनाची मागणी देखील या मेळाव्यात करण्यात आली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version