Sunil Tatkare : दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण ते पार्थ-जय पवार यांचे पक्षातील महत्त्व; सर्व मुद्द्यांवर स्पष्ट बोलले प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे

Sunil Tatkare : दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण ते पार्थ-जय पवार यांचे पक्षातील महत्त्व; सर्व मुद्द्यांवर स्पष्ट बोलले प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज, गुरुवारी माध्यमांसमोर बोलताना दोन्ही पक्षाचे विलीनीकरणावर परखडपणे भाष्य केले. उपमुख्यमंत्री अजित पवार हे हयात असताना राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांच्यासोबत विलीनीकरणाच्या चर्चा नक्कीच झाल्या आहेत, असे मत तटकरे यांनी मांडले. मात्र आता या चर्चांना स्वतः खासदार सुप्रीया सुळे आणि शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पूर्णविराम दिला आहे. त्यामुळे विलीनीकरणाचा प्रश्नच उद्भवत नाही, असेही तटकरे यांनी नमूद केले. तसेच गेल्या काही दिवसांपासून माध्यमांमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ आणि जय पवार यांची पक्षातील मजबूत पकड याबाबत अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यात प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना मात्र डावललं जात असल्याचेही बोलले जात होते. परंतू याही विषयावर तटकरे यांनी पडदा टाकत पार्थ आणि जय पवार हे आता राजकारणात सक्रीय झाले आहेत. त्यामुळे सगळे एकत्र मिळून पक्ष वाढीसाठी काम करत आहोत, असे तटकरे म्हणाले. शिवाय पार्थवर नाराजी नाही, कोणावरही नाराज असल्याचे कारण नाही, असेही तटकरे यांनी नमूदकेले. 

हेही वाचा : Ratnagiri Politics: कोकणात ठाकरेंची ताकद वाढली; रत्नागिरीत भास्कर जाधव यांच्या उपस्थितीत शेकडो पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version