अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी शिर्डीपर्यंत काढली दिंडी

अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत यासाठी कार्यकर्त्यांनी बारामती ते शिर्डी पायी दिंडी काढली.
अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी शिर्डीपर्यंत काढली दिंडी

बारामती : राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा शपथ विधी दोन दिवसात होण्याची शक्यता आहे. भाजपचे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील हे जवळपास निश्चित झाले आहे.  मात्र प्रत्येक कार्यकर्त्यांला वाटत असते आपला नेता हा राज्याचा मुख्यमंत्री व्हावा असे वाचत असते. तसेच बारामतीतील अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना वाटत आहे. त्यामुळे बारामतीतील माजी नगरसेवक बिरजू मांढरे यांनी बारामती ते शिर्डी अशी पायी दिंडी काढली आहे. अजितदादा राज्याचे मुख्यमंत्री होऊ दे असं साकडं साई बाबांच्या चरणी जाऊन घालणार आहेत. परंतु अर्ध्या वाटेत असतानाच अजितदादा मुख्यमंत्री झाले अशी गोड बातमी मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.

महायुतीमध्ये भाजपा विधानसभेत जास्त जागांवर विजयी झाली. त्यानंतर महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण ? असा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडला होता. भाजपा आणि शिवसेनेकडून मुख्यमंत्री पदावर दावा करण्यात येत होता. मात्र बुधवारी पत्रकार परिषद घेत काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदी जो निर्णय घेतील त्याला पाठिंबा देणार असल्याचे सांगत मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेतून बाहेर पडले. आता महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री भाजपाचाच होईल असे चित्र स्पष्ट झाले आहे.

अजितदादांच्या कार्यकर्त्यांप्रमाणेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसैनिकांनी देखील पायी दिंडी काढली होती. कार्यकर्त्यांना नेहमीच आपला नेता मुख्य पदावर असावा वाटत असते. शेवटी कार्यकर्ता हाच त्यांच्या नेत्यासाठी एकनिष्ठ असतो. नेत्यासाठी कायम झटणारा, तत्परतेने काम करणारा असतो. अजितदादांच्या कार्यकर्त्यांची पायी दिंडी हे त्यांचच एक उत्तम उदाहरण म्हणून शकतो.

 

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version