Maharashtra Election 2026 : मोठी बातमी; काका-पुतणे पुन्हा एकत्र, पुण्यात युती; जागावाटपही ठरलं

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आणि अजित पवार गट एकत्र लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Maharashtra Election 2026 : मोठी बातमी; काका-पुतणे पुन्हा एकत्र, पुण्यात युती; जागावाटपही ठरलं

पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या पडद्यामागच्या हालचाली आणि गुप्त बैठकांना अखेर यश आले असून, आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट (शरद पवार आणि अजित पवार गट) एकत्र निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

विचारसरणीच्या मुद्द्यावरून दोन्ही बाजूंनी टोकाची भूमिका घेतली जात असतानाच, बारामतीत गौतम अदानी यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमानंतर पवार कुटुंबातील जवळीक वाढली आणि युतीवर शिक्कामोर्तब झाले.

पुणे महानगरपालिकेच्या जागावाटपाचे सूत्रही आता समोर आले असून, यामध्ये अजित पवार गट 125 जागांवर तर शरद पवार गट 40 जागांवर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. प्रशांत जगताप यांनी उपस्थित केलेल्या नैतिकतेच्या प्रश्नामुळे ही युती बारगळणार असे वाटत होते, मात्र सत्ता समीकरणांच्या गणितात दोन्ही बाजूंनी समन्वयाची भूमिका घेतल्याचे दिसते. केवळ पुणेच नाही, तर पिंपरी-चिंचवडमध्येही दोन्ही राष्ट्रवादींनी 'हातमिळवणी' केल्याने विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

हेही वाचा: BMC Election 2026: उद्धव ठाकरेंसमोरच बड्या नेत्यांमध्ये खडाजंगी; महापालिका निवडणुकीपूर्वीच ठाकरे गटात पेच, नेमकं काय आहे प्रकरण?

विशेष म्हणजे, या युतीचा प्रभाव केवळ पश्चिम महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून मुंबईतही दोन्ही गटांमध्ये एक वेगळ्या प्रकारचा 'समझोता' झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. आज दुपारी पुण्यात होणाऱ्या पत्रकार परिषदेत या युतीची अधिकृत घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात 'काका-पुतणे' पुन्हा एकत्र आल्याचे चित्र निर्माण झाले असून, मतदारांच्या मनात संभ्रम आणि उत्सुकता दोन्ही दाटली आहे.

या राजकीय भूकंपाचे विश्लेषण करायचे झाले तर, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपले वर्चस्व टिकवण्यासाठी दोन्ही गटांनी अंतर्गत मतभेद बाजूला ठेवल्याचे दिसते. भाजप आणि इतर मित्रपक्षांशी असलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादीचे हे दोन्ही गट 'महापालिका' स्तरावर एकत्र आल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा प्रयोग पाहायला मिळणार आहे. या युतीमुळे पुण्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलणार आहेत. 

हेही वाचा: Thalapathy Vijay: थलापतीला पाहताच चाहत्यांची त्याच्याकडे धाव; गर्दी एवढी वाढली की अभिनेत्याचा तोल गेला आणि… पाहा Video

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version