Pimpri Chinchwad Municipal Election 2026 : महेश लांडगेंबाबत अजित पवार यांचं सूचक वक्तव्य; म्हणाले, ‘ते स्वतः हुशार…’

पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी हमीपत्र प्रसिद्ध केल्यानंतर आता राष्ट्रवादीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठीचे हमीपत्र जाहीर केले.
Pimpri Chinchwad Municipal Election 2026 : महेश लांडगेंबाबत अजित पवार यांचं सूचक वक्तव्य; म्हणाले, ‘ते स्वतः हुशार…’

पिंपरी चिंचवड : पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी हमीपत्र प्रसिद्ध केल्यानंतर आता राष्ट्रवादीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठीचे हमीपत्र जाहीर केले. आज अजित पवार यांनी पिंपरीत हे हमीपत्र जाहीर केले असून यावेळी खासदार अमोल कोल्हे आणि आमदार रोहित पवार हे राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार गट) चे नेतेदेखील उपस्थित होते. यावेळी अजित पवार यांनी पिंपरी चिंचवडसाठीचा मेगाप्लॅन मांडला असून सोबत गेले दोन दिवस सुरू असलेला महेश लांडगे यांच्या वक्तव्याचा समाचार देखील घेतला.  

हेही वाचा : BMC Election 2026 : ठाकरेंना अवघ्या चार तासांत पुन्हा मोठा धक्का; दगडू सपकाळांपाठोपाठ ‘या’ निष्ठावंत शिलेदाराचाही राजीनामा?

काय म्हणाले अजित पवार  

पिंपरी चिंचवड निवडणुकीत आम्ही आमच्या विरोधकांवर अनेक आरोप केले. आता आम्ही काय करणार आहोत. हे आम्ही तुम्हाला या हमी पत्राच्या माध्यमातून सांगणार आहोत. पिंपरी चिंचवड शहराचा विकास आम्ही केला, हे कुणी नाकारू शकत नाही. कर्ज रोखे काढून आणि बिलं थकवून या महापालिकेचा भाजपने बोजवारा उडवला आहे. पाणी टंचाई, कचरा प्रश्न आणि वाहतुककोंडीमुळे नागरिक वैतागले गेले आहेत. पर्यावरणापूरक आणि हरित पिंपरी चिंचवड आम्ही करू पाहत आहोत. लोकप्रतिनिधी आणि नागरिकांचे संबंध चांगले असावे, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. निर्णय प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग आम्ही करणार आहोत. नियमित पाणीपुरवठा करून आम्ही टँकरमुक्त पिंपरी चिंचवड करणार आहोत. आरोग्य, शिक्षण आणि महिला सक्षमीकरण आम्ही करणार आहोत. हा जाहीरनामा हा कागदावरचा शब्द नाही, तर पिंपरी चिंचवड शहराची एक प्रकारे ब्ल्यू प्रिंट आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र मिळून आम्ही लोकाभिमुख कामकाज करू. 

महेश लांडगे म्हणाले की इथे एसआरएचे बाप सगळे झालेले आहेत. आम्ही चौकशी करू, असा कार्यक्रमात महेश लांडगेंबाबत प्रश्न विचारला असता,  यावर अजित पवार म्हणाले की, चौकशी करा, पाठिंबा आहे. एकदाचं होऊन जाऊ दे, दूध का दूध, पानी का पानी होऊ द्या. कुणाकुणाचे लागेबांधे आहेत.कुणीकुणी काय केलंय. खरचं झोपड्या होत्या का, का झोपड्या बोगस दाखवल्या. रावेत, भोसरी, पिंपरी, चिंचवड सगळीकडे चौकशी होऊ द्या. आपल्या कार्यक्षेत्रात जिथेजिथे एसआरए चालंलयं ते सगळंच होऊ द्या. मी कधीच चुकीचं समर्थन करणार नाही. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version