NCP: राज्यसभेची लॉटरी कुणाला लागणार? राष्ट्रवादीच्या गोटात अनेक दिग्गज रेसमध्ये

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभा जागेवरून राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
NCP: राज्यसभेची लॉटरी कुणाला लागणार? राष्ट्रवादीच्या गोटात अनेक दिग्गज रेसमध्ये

ज्यसभेच्या रिक्त जागेवरून महायुतीत सध्या मोठी राजकीय चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील ही जागा नेमकी कोणाच्या वाट्याला जाणार, याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना राष्ट्रवादी काँग्रेसने अद्याप अधिकृत उमेदवाराची घोषणा केलेली नाही.गेल्या काही दिवसांत या जागेसाठी भाजपकडून किंवा महायुतीतील इतर नेत्याला संधी दिली जाऊ शकते, अशा चर्चांना जोर आला होता. विशेषतः माजी खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची घेतलेली भेट चर्चेचा विषय ठरली होती. त्यामुळे राज्यसभेसाठी त्यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात होते. मात्र, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पक्षाचाच उमेदवार निवडणूक लढवेल आणि तो राष्ट्रवादीच्या चिन्हावरच राज्यसभेत जाईल, असे स्पष्ट संकेत दिले.

तरीदेखील उमेदवाराच्या नावाबाबतचा सस्पेन्स कायम आहे. अद्याप पक्षाच्या कोर कमिटीची अधिकृत बैठक झालेली नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे अंतिम निर्णय नेमका कधी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.दरम्यान, राज्यसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही प्रमुख नेत्यांची नावे चर्चेत आली आहेत. त्यामध्ये प्रमोद हिंदुराव, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, अविनाश आदिक आणि समीर भुजबळ यांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. या नावांपैकी कोणाला पक्षाकडून संधी मिळणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

राज्यसभा उमेदवारीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत जवळ येत असताना महायुतीतील घडामोडींनाही वेग आला आहे. राष्ट्रवादी ही जागा स्वतः लढवणार की मित्रपक्षासाठी सोडणार, याबाबत अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे पुढील २४ ते ४८ तास राज्याच्या राजकारणासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत.राजकीय समीकरणे, पक्षांतर्गत चर्चा आणि महायुतीतील रणनीती यावर अंतिम निर्णय अवलंबून असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे राज्यसभेची ही जागा नेमकी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होते, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version