सियाचीन, डोकलाम, लदाख यासारख्या दुर्गम भागात भारतीय सैनिक देशसेवा करतात. परंतु या सैनिकांना पुरेसे कपडे आणि अन्न मिळत नसल्याचा प्रकार समोर आला आहे.
या सर्व प्रकरणावरुन सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.याबाबतीत धनंजय मुंडे यांनी एक ट्विट केलं आहे.
मतं मागताना सैनिकांच्या नावाने आपली पोळी भाजणाऱ्या भाजपचा खोटारडेपणा कॅगने उघडा केला असल्याचं धनंजय मुंडे म्हणाले आहेत.
सियाचीन, डोकलाम, लदाख या अतिदुर्गम भागात जीव मुठीत घेऊन देशसेवा करणाऱ्या सैनिकांना ना पुरेसे कपडे आहेत ना मुबलक पोषक आहार.
सैनिकांच्या बाबतीत अक्षम्य दुर्लक्ष करणाऱ्या केंद्र सरकारचा जाहीर निषेध! अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारचा निषेध केला आहे.
सोमवारी ३ फेब्रुवारीला कॅगने संसदेमध्ये अहवाल मांडला होता. या अहवालात सैनिकांना कपडे, जेवण आणि बुटं मिळत नसल्याचं कॅगच्या अहवालातून समोर आलं.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.