बीडच्या सभेत पवारांचा सरकारवर घणाघात

बीडच्या सभेत पवारांचा सरकारवर घणाघात

बीड, १७ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या बीडच्या सभेत शरद पवारांनी शिंदे सरकारवर घणाघात केला. सरकारला शेतकऱ्यांची चिंता नाही, असा आरोप शरद पवार यांनी केला. सरकारची समाजात अंतर वाढवण्याची निती आहे, असेही शरद पवार म्हणाले. पंतप्रधान मोदी यांनी पुन्हा येईन असं सांगितलं, महाराष्ट्राचे एक मुख्यमंत्री होते ते पण असंच म्हणत होते. माझं मोदींना सांगणं आहे की, पुन्हा येण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांचं मार्गदर्शन घ्या, असंही शरद पवार म्हणाले.

सभेत बोलताना शरद पवार यांनी राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही टीप्पणी केली. बीड जिल्ह्यातील नेता पक्ष सोडून गेला. त्यावर एकाने त्याला विचारले तुम्ही पक्ष का सोडला? त्यावर त्याने सांगितले साहेबांचे वय झाले.मी म्हणतो तुम्ही माझे काय पाहिले म्हणून म्हणताय माझे वय झाले; असे शरद पवार म्हणाले.

केंद्र सरकारवर टीका

देशाची सत्ता चमत्कारीक लोकांच्या हातात आहे. जात ,धर्म आणि भाषेच्या आधारावर लोकांमध्ये अंतर कसं वाढवता येतील, अशी नीती सत्ताधाऱ्यांची आहे. केंद्रातील सत्तेच्या जोरावर गोवा, महाराष्ट्र, मध्य प्रदेशातील सरकार पाडलं गेलं. स्थिर सरकार देतो म्हणता आणि केंद्राच्या सत्तेच्या जोरावर लोकांनी निवडून दिलेली सरकारं पाडतात, अशी टीका शरद पवार यांनी केली.

मी पुन्हा येईन हे नक्की काय प्रकरण आहे? पाहुयात,

देवेंद्र फडणवीस यांनी २०१९च्या विधानसभा निवडणूक प्रचारात मी पुन्हा येईन अशी घोषणा केली.
फडणवीस त्यावेळी भाजपा – शिवसेना युतीचे भावी मुख्यमंत्री म्हणून निश्चित होते.
‘मी पुन्हा येईन’ या घोषणेला प्रतिसाद देत जनतेने भाजपा – शिवसेना युतीला १६५ जागा निवडून दिल्या.
महाराष्ट्रातील जनतेने इतके सुस्पष्ट बहुमत यापूर्वी कधीच कोणत्याही युतीला दिले नव्हते.
बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजनांच्या काळातही भाजपा शिवसेना युतीला बहुमत नव्हते.
फडणवीसांच्या घोषणेमुळे भाजपा – शिवसेनेची युती सत्तेत येणार असतानाच घात झाला.
उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदासाठी भाजपाची साथ सोडून काँग्रेस – राष्ट्रवादी सोबत घरोबा केला.
उद्धव ठाकरेंमुळे जनतेने निवडून दिलेले भाजपा शिवसेनेचे बहुमतात सरकार अस्तित्वात आले नाही.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version