नवज्योतसिंह सिद्धू यांनी दिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षाचा राजीनामा

नवज्योतसिंह सिद्धू यांनी दिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षाचा राजीनामा

देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकींमध्ये पंजाबचा दारूण पराभव झाला आहे. तर पंजाबमध्ये काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर पक्षात बदलाची प्रक्रिया सुरू झाली आहे. दरम्यान, नवज्योत सिंह सिद्धू यांनी पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

उत्तरप्रेदश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी या पाच राज्यांच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा राजीनामा मागितला आहे. त्यानुसार नवज्योत सिंह सिद्धू यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

नवज्योत सिंह सिद्धू यांनी ट्विट करून पंजाब प्रदेश अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची माहिती दिली आहे. त्यांनी ट्विट केले की, ‘काँग्रेस पक्षाच्या इच्छेनुसार मी हे केले आहे.’

पंजाब विधानसभा निवडणुकींमध्ये काँग्रेसचा पराभव झाला असून आम आदमी पार्टीने विजयाचा झेंडा रोवला आहे. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला केवळ १८ जागा जिंकता आल्या आहेत. तर अमृतसर पूर्व मतदार संघातून नवज्योत सिंह सिद्धू यांचा आपच्या उमेदवाराकडून पराभव झाला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version