नाशिक : महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरीच्या घटना वारंवार होताना पाहायला मिळत असतात. असा प्रकार नाशिक शहरात घडल्याचे दिसून आले आहे. महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरी करणाऱ्या दोन गुन्हेगारांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं आहे.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या चोरांवर 20 सोनसाखळी चोरीचे गुन्हे व मोटरसायकल चोरीचा, एक घरफोडी असे मिळून 22 गुन्हे उघड झाले आहेत. तब्बल 18 लाख 11 रुपये किमतीचा मुद्देमाल त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आला आहे. नाशिक शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून सोनसाखळी चोरीच्या घटनेत वाढ झाली होती. एका दिवसातच पाच सोनसाखळी चोरी झाल्याची बाब दर्शनास आल्यानंतर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने नाशिक शहरापासून सिन्नरपर्यंत जवळपास दीडशेपेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेरे तपासून दीड महिन्यांपासून मागावर असलेल्या अट्टल सोनसाखळी चोरांचा पर्दाफाश केला आहे.
हेही वाचा : गंगापुरमधील बनावट दारू कारखाना उद्ध्वस्त
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.