मुंबई : नाशिक- मुंबई महामार्गावर २ ते ३ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच्या लांब रांगा निर्माण झाल्या आहेत. पावसाळ्यातील खड्ड्यांमुळे मुंबई नाशिक महामार्ग ठप्प झाला आहे. नाशिकच्या विल्होळी ते वाडीवारे दरम्यान प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊनही महामार्गावरील खड्डे जैसे थे असल्याचे दृष्य आहे. एकही वाहतूक पोलीस उपस्थित नसल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मुंबईवरून नाशिककडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.