Nashik Ashok Kharat Case: खरातचे कारनामे उघड करणाारा पोलिसांच्या ताब्यात; नराधम अशोक खरातची संपत्ती किती?

नाशिकमधून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. कॅप्टन खरातचे कारनामे उघड करणाारा नीरज जाधव अखेर पोलिसांच्या ताब्यात आला आहे.
Nashik Ashok Kharat Case: खरातचे कारनामे उघड करणाारा पोलिसांच्या ताब्यात; नराधम अशोक खरातची संपत्ती किती?

नाशिकमधून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. कॅप्टन खरातचे कारनामे उघड करणाारा नीरज जाधव अखेर पोलिसांच्या ताब्यात आला आहे. नीरज जाधव नाशिक क्राईम पोलिसांच्या ताब्यात असून नीरज जाधवच्या विरोधात शिर्डीत पीडित मुलीला तिचे मॉर्फ व्हिडीओचे स्क्रीनशॉट्स पाठविल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. नीरज जाधवनेच कॅप्टन खरातच्या केबिनमधील सीसीटीव्ही फुटेज बाहेर आणले असून 100 हुन अधिक लैंगिक शोषणाचे सीसीटीव्ही फुटेज असल्याची माहिती आहे.

हेही वाचा-Ashok Kharat Case: कानाजवळ पुटपुटायचा, पेढा, गायत्री मंत्री म्हणायला लावायचा आणि…; कॅप्टन खरातच्या लैंगिक शोषणाचा ‘हा’ होता पॅटर्न
कोण आहे नीरज जाधव?
नीरज जाधव हा स्वयंघोषित कॅप्टन खरातच्या मर्जीतील ऑफिस बॉय असून त्याच्यामुळेच खरातचे बिंग फुटले. एका महिलेच्या तक्रारीनूसार, नीरज जाधवने पिडीत महिलेला कॅप्टन खरातच्या ऑफिसमधील आक्षेपार्ह व्हिडीओचे स्क्रीनशॉट पाठवत धमकावले होते. या फिर्यादीवर फेब्रुवारी 2026 ला नीरज जाधव विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. डिसेंबर 2025 मध्ये नीरजने खरातच्या नकळत फिर्यादी महिलासोबत घडलेल्या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. दुष्कृत्य करूनही खरात समाजात ‘साधू’ म्हणून वावरत असल्याचे पाहून नीरजच्या मनात पैशांची हाव निर्माण झाली. त्याने खरातला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. नीरज आणि त्याच्या काही साथीदारांनी या वादग्रस्त क्लिप्सच्या बदल्यात खरातकडे पाच कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. खरातने दाद न दिल्याने नीरजने पीडित महिलांची मदत घेण्याचा प्रयत्न केला. त्याने शिर्डीतील एका 24 वर्षीय विवाहितेचे मॉर्फ केलेले फोटो आणि व्हिडीओ तिलाच व्हॉट्सअॅपवर पाठवून धमकावले. त्यानंतर या पीडितेने खरातला कळविले. परंतु, खरातने स्वतःला वाचविण्यासाठी तिला पोलिसात जाण्यास सांगितले. खरातकडून पैसे मिळण्याची शक्यता धूसर झाल्याने नीरजने सिडकोतील 28 वर्षीय विवाहितेचा व्हिडीओ तिच्या मेहुण्याला पाठविला. मेहुण्याने पीडितेला धीर देत फिर्यादीसाठी प्रोत्साहित केले त्यानंतर हे सगळे प्रकरण उघडकीस आल्याची माहिती आहे. 

हेही वाचा- Chitra Wagh On Ashok Kharat Case:”हे सरकार अ‍ॅक्शन घेणार, आता सत्य लपणार नाही” कॅप्टन खरात प्रकरणावर चित्रा वाघ कडाडल्या
अशोक खरातची संपत्ती किती?
नाशिकमधील अशोक खरात याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली असून या भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरातच्या प्रॉपर्टीची यादी समोर आली आहे. दरम्यान नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात अशोक खरातने जवळपास 30 हून अधिक ठिकाणी प्लॉटस खरेदी केल्याची माहिती आहे. त्याच्याकडे असलेल्या सर्व जमिनींची किंमत जवळपास 500 कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे. तसेच अशोक खरातसह त्याची बायको, मुलगी, नातेवाईकांच्या नावावर देखील संपत्ती असल्याचे समोर आले आहे. या सर्व मालमत्ताची तपासणी होणार का ? याकडे आता लक्ष लागले आहे.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version