‘उद्धव, पवारांना महाराष्ट्र पेटवायचाय’

उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना महाराष्ट्रात दंगल घडवायची आहे. राज्यात हिंसाचार घडवून आणायचा आहे, असा आरोप भाजपा खासदार नारायण राणे यांनी केला.
‘उद्धव, पवारांना महाराष्ट्र पेटवायचाय’

मुंबई : उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना महाराष्ट्रात दंगल घडवायची आहे. राज्यात हिंसाचार घडवून आणायचा आहे, असा आरोप भाजपा खासदार नारायण राणे यांनी केला. ते मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. उद्धव स्वार्थी आणि भ्रष्ट आहे, असेही नारायण राणे म्हणाले. 

नारायण राणेंनी पत्रकार परिषदेत उद्धववर तिखट शब्दांत टीका केली. त्यांनी उद्धवचा सातत्याने एकेरी उल्लेख केला. ‘मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या फोटोंना हा माणूस जोडे मारतो. मुख्यमंत्र्यांना गेट आऊट म्हणतो. अरे तुझी लायकी काय ? कोण आहेस तू ? असा नेता असतो का ? तुलाच जनतेनं अडीच वर्षांपूर्वी गेट आऊट म्हटलंय,’ अशा भाषेत राणेंनी उद्धववर घणाघात केला. 

काँग्रेसचे नेते मणीशंकर अय्यर यांनी २००४ मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आक्षेपार्ह विधान केले. त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्त्वात शिवसैनिकांनी आंदोलन केले. अय्यरच्या फोटोला जोडे मारले. आता त्याच बाळासाहेबांचा मुलगा काँग्रेससोबत गेला आहे आणि जोडे मारो आंदोलन करतोय. याला पक्ष सांभाळता आला नाही. हा काय मुख्यमंत्री होणार ? ४० आमदार याला सोडून गेले, अशी टीका राणेंनी केली. 

पंतप्रधान मोदींनी पुतळा प्रकरणी माफी मागितली. या माफीला उद्धव मग्रुरीची भाषा म्हणतो. मोदींवर बोलण्याची उद्धवची लायकी नाही. कोविड काळात उद्धवने भ्रष्टाचार केला. उद्धवसोबत राहिलेल्या नेत्यांनी वेळोवेळी मातोश्री बंगल्यावर पैसे पोहोचवले. त्याची पावती कधी उद्धवने दिली नाही. आता पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी काँग्रेस, पवारांच्या घरचे उंबरे झिजवतोय असेही नारायण राणे म्हणाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version