नाशिक : कोरोनाचा संभाव्य तिसऱ्या लाटेची परिस्थिती लक्षात घेता नाशिक शहर पोलीस पुन्हा एकदा ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. शहरात ठीकठिकाणी होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नाशिक पोलिसांनी शहरात जवळपास ४० ठिकाणी नाकाबंदी लावून गर्दीवर नियंत्रण मिळवण्याचा काम करत आहेत. मागच्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात असले तरी पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून प्रशासनाकडून या उपाययोजना केल्या जात आहेत. अत्यावश्यक सेवा सोडून शहरातील सर्व दुकानं चार नंतर बंद ठेवण्याचा निर्णय झालेला असताना देखील काही ठिकाणी लोकांची गर्दी होत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.