नागपुरातील ऋषी खोसला हत्या प्रकरणात 4 आरोपींना अटक

नागपुरातील ऋषी खोसला हत्या प्रकरणात 4 आरोपींना अटक

नागपुरातील बहुचर्चित खोसला हत्या प्रकरणात पोलिसांनी आणखी 4 आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी या आधीच मुख्य आरोपी मिक्की बक्षी याला अटक केली असल्याने या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या 5 झाली आहे. ऋषी खोसला यांची हत्या अनैतिक संबंधातून हत्या झाल्याचे उघड झाले आहे, या प्रकरणात आणखी काही आरोपींना अटक होण्याची शक्यता आहे.

नेमकं प्रकरण काय?

22 ऑगस्ट रोजी कुलर व्यवसायी ऋषी खोसला या व्यावसायिकाची नागपूरच्या गोंडवाना चौकात निर्घृण हत्या करण्यात आली होती. प्रकरण हाय-प्रोफाइल असल्याने पोलिसांना या खुनाचा उलगडा करण्याचा दबाव होता. घटनेच्या काही तासातच पोलिसांनी ऋषी खोसला हत्या प्रकरणात मुख्य आरोपी मिक्की बक्षी याला अटक केली होती,मात्र अन्य आरोपी पळून गेल्याने त्यांचा अटक करण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरु केले होते.

आरोपींचा शोध सुरु असताना 4 आरोपी हे वाडी परिसरातील एका बौद्ध विहारात लपून बसलेले असल्याची माहिती कळल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून चारही आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये राहुल कळमकर,कुणाल हेमणे,अरिफ इनायत खान, आणि अझीझ अहमद यांचा समावेश आहे. या प्रकरणात पाच आरोपी अटक झाल्यानंतर ऋषी खोसला यांच्या हत्येमागील कारणांचा उलगडा झालेला आहे.

या प्रकरणातील मुख्य आरोपी मिक्की बक्षी आणि ऋषी खोसला हे जुने मित्र होते. मिक्की आणि त्याच्या पत्नी मध्ये पटत नसल्याने ते दोघेही विभक्त राहायचे, काडीमोड घेण्यासाठी त्यांनी न्यायालयात एकमेकांविरुद्ध तक्रार नोंदवली असून त्या करिता ऋषी हा मिक्कीच्या पत्नीला मदत करायचा,शिवाय ऋषी आणि मिक्कीच्या पत्नीमध्ये अनैतिक संबंध असल्याचा संशय मिक्कीला असल्याने तो गेल्या अनेक दिवसांपासून ऋषीच्या मागावर होता.

22 ऑगस्टच्या रात्री मिक्की ने भाडोत्री आरोपींच्या मदतीने ऋषीची हत्या घडवून आणली,पण त्याचा गुन्हा फार काळ लपू शकलेला नव्हता. पोलिसांनी या आधीच मुख्य आरोपी मिक्की बक्षी याला अटक केली असल्याने या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या 5 झाली आहे. ऋषी खोसला यांची हत्या अनैतिक संबंधातून हत्या झाल्याचे उघड झाले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version