नागपूरमध्ये जगातील सर्वात उंच कारंजे

नागपूरमध्ये जगातील सर्वात उंच कारंजे

 केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने नागपूरमध्ये जगातील सर्वातील उंच कारंजे निर्माण केले जात आहे. नागपुरमधील फुटाळा तलावात जगातील सर्वात उंच कारंजेचे काम सुरु आहे. फ्रेंच आर्किटेक्ट्स हे या कारंज्याचे काम करत आहेत.

 नागपूरमध्ये तयार होत असलेल्या जगातील सर्वात उंच कारंज्याला पार्श्वसंगीतदेखील असणार आहे. संगीतकार ए. आर. रेहमान यांचे संगीत, ज्येष्ठ अभिनेता अमिताभ बच्चन यांचा आवाज, आणि गुलजार यांची काँमेन्ट्री यांची जुगलबंदी कारंज्याच्या पार्श्वसंगीतात ऐकायला मिळणार आहे. हे तीनही कलाकार यावर काम  करत असून त्यांचा ट्रायलसुद्धा घेण्यात आला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल  होत आहे. तसेच येत्या नवीन वर्षांत जगातील सर्वात उंच कारंज्याचे लोकर्पण करण्यात येणार आहे. नागपूरमधील या कारंज्याच्या शो एका वेळी हजारो नागरिकांना पाहता येणार आहे. तसेच या संगीतमय कारंज्यातून नागपूरच्या पर्यटनाला चालना मिळणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version