Nagpur Crime: नागपूर हादरलं! पूर्व वैमनस्यातून तरूणाला संपवलं, जादूमहल परिसरात घडली धक्कादायक घटना

धक्कादायक बाब म्हणजे या गुन्ह्यात सामील असलेले सर्व आरोपी अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे.
Nagpur Crime: नागपूर हादरलं!  पूर्व वैमनस्यातून तरूणाला संपवलं, जादूमहल परिसरात घडली धक्कादायक घटना

राज्यभरात गुन्ह्यांच्या संख्येत वाढ होत आहे. अशातच आता नागपूरातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. नागपूरच्या अजनी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या जादूमहल चौकात जुन्या वैमनस्यातून एका तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे. या हल्ल्यात त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे, धक्कादायक बाब म्हणजे या गुन्ह्यात सामील असलेले सर्व आरोपी अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे.

नागपूरच्या अजनी परिसरातील जादूमहल चौकात 10 ते 12 अल्पवयीन मुलांच्या टोळीने दोन तरुणांवर धारदार शस्त्रांनी हल्ला चढवला. या हल्ल्यात 25 वर्षीय सागर गिरीधर सलामे याचा मृत्यू झाला, तो आठवडी बाजारात भाजी विकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा.

हेही वाचा – Jalna Crime : प्रेमाच्या जाळ्यात ओढून महाविद्यालयीन तरुणीवर अत्याचार; ओळख लपवण्यासाठी आरोपी घालायला लावायचा ‘बुरखा’ 

समोर आलेल्या माहितीनुसार,  साधारण 10 दिवसांपूर्वी सागरचा एका अल्पवयीन मुलाशी वाद झाला होता. याच वादाचा बदला घेण्यासाठी आरोपींनी कट रचला. घटनेच्या रात्री महाप्रसाद कार्यक्रमादरम्यान सागरला फोन करून जादूमहल चौकात बोलावण्यात आले. सागर त्याचा मित्र हर्षल याच्यासह तिथे पोहोचताच, आधीच दबा धरून बसलेल्या आरोपींनी त्यांना घेरले.त्यानंतर लाठ्या-काठ्या, लोखंडी रॉड आणि चाकूने त्यांच्यावर सपासप वार करण्यात आले. 

हेही वाचा – Pandharpur Crime: पंढरपूर हादरलं! ज्या दिवशी वाढदिवस त्याच दिवशी रीलस्टार महिलेचा द एंड; प्रियकरानेच काढला काटा 

गंभीर जखमी झालेला सागर तिथेच कोसळला, त्याला तातडीने रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दुसरीकडे, त्याचा मित्र हर्षल हा देखील गंभीर जखमी अवस्थेत जीव वाचवण्यासाठी तिथून पळाला आणि सक्करदरा तलावाजवळ जाऊन कोसळला. त्यानंतर त्याच्या मित्रांनी त्याला रुग्णालयात दाखल केले, जिथे त्याची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version