मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीने उमेदवार जाहीर करण्यात आघाडी घेतली आहे. महायुतीतील भाजपाने पहिल्या यादीतून ९९ उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. पण मविआकडून अद्याप एकही यादी जाहीर झालेली नाही. शिउबाठाचे जागावाटपावरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी मतभेद सुरू असल्यामुळे मविआची यादी जाहीर होण्यास वेळ लागत असल्याचे वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर मविआ फूट पडलेली नाही… मविआ एकोप्याने लढेल असा दावा शिउबाठाच्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. संजय राऊतांनीही चर्चा सुरू आहे आणि तिढा लवकरच सुटेल असा विश्वास व्यक्त केला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.