कोल्हापुरात ‘या’ ठिकाणी मटण स्वस्त दरात

कोल्हापुरात ‘या’ ठिकाणी मटण स्वस्त दरात

कोल्हापूर : कोल्हापूर म्हटलं की सर्वात आधी आठवतो तो तांबडा-पांढरा. कोल्हापुरात गेल्या काही दिवसांपासून मटणाचे दर वाढले आहेत. या वाढलेल्या मटणाच्या दरावर कोल्हापुरकरांनी तोडगा काढला आहे. मटणाच्या वाढलेल्या दरामुळे कोल्हापुरकर मटणापासून वंचित राहू नये म्हणून कोल्हापुरकरांनी पुढाकार घेतला आहे.

स्थानिकांनी स्वत: बकरी खरेदी करुन कोल्हापुरकरांची स्वस्तात मटणाची सोय केली आहे. राजारामपूरीत 425 रुपयाला एक किलो मटण मिळत आहे. स्वस्तात मटण मिळत असल्यामुळे या ठिकाणी कोल्हापुरकरांनी मटण घेण्यासाठी एकच गर्दी केली आहे.

कोल्हापुरात इतर ठिकाणी एक किलो मटणासाठी 600 रुपये मोजावे लागत आहेत. पण राजारामपुरीत स्वस्तात मटण मिळत असल्याने कोल्हापुरकरांचा रविवार मात्र गाजणार इतकं नक्कीच.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version