मोहित कंबोज यांच्या घरी पालिकेचे अधिकारी दाखल

मोहित कंबोज यांच्या घरी पालिकेचे अधिकारी दाखल

राज्यात महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर ईडीची छापेमारी सुरू असताना, आता बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी भाजप नेते मोहित कंबोज यांच्या घरी मुंबई महापालिकेचे अधिकारी दाखल झाले आहेत. याआधी मोहित कंबोज यांना पोलिकेने नोटीस पाठवली होती.

मोहित कंबोज यांच्या घरी मनपाचे अधिकारी दाखल झाले आहेत. अनधिकृत बांधकामासाठी मोहित कंबोज यांना नोटीस पाठवण्यात आली होती. त्यानंतर आज पालिकेचे अधिकारी कंबोज यांच्या घरी दाखल झाले आहेत. आज त्यांच्या बेकायदेशीर बांधकामाची पाहणी करण्यात येणार आहे. त्यानंतर पालिकेकडून येत्या काही दिवसात कारवाई करण्यात येईल. अद्याप पालिकेकडून कंबोज यांच्या घरावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

मोहित कंबोज यांच्या घरासोबतच त्यांच्या कार्यालयाचेही बांधकाम अनधिकृत असल्याची नोटीस पालिकेने त्यांना बजावली आहे. एमआरडीपी या कायद्यानुसार ही कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version