मुनगंटीवारांच्या स्वीय सहायकाला चोपलं

मुनगंटीवारांच्या स्वीय सहायकाला चोपलं

‘नोकरी लाऊन देण्याचे आमिष दाखवित सुशिक्षित बेरोजगारांकडून लाखो रुपये घेतल्याचा आरोपावरून मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे माजी स्वीय सहायक अजय धवणे यांना एक पीडिताने लाथा बुक्यांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमुळे एकच खळबळ उडाली आहे. मारहाण करत असलेल्या पीडिताकडून नोकरी लावून देण्याच्या नावावर १३ लाख रुपये घेतले आहेत. धवणे याने नोकरीच्या नावावर एक लाखापासून तीस लाखापर्यंत पैसे उकळल्याच्या चर्चा सुरू आहेत. मुनगंटीवार यांनी धवणे यांना कामावरून काढले असल्याचे बोलले जात आहे.

महाराष्ट्रातील राजकारणात सुधीर मुनगंटीवार हे मोठे नाव आहे. स्वपक्षीय आणि इतर पक्षातील कार्यकर्ते सुद्धा मुनगंटीवार यांचे नाव आदराने घेतात. वृक्ष लागवड, जुन्या इमारती पाडून नव्या इमारती उभे करणे, मंत्री असताना आपल्या विधानसभा क्षेत्राच्या सर्वाधिक विकास मुनगंटीवार यांनी केला. यावरून अधूनमधून मुनगंटीवार यांच्यावर टीका केली जाते. असे असतानाही चंद्रपूरच्या राजकारणात मुनगंटीवार यांचे नाव सन्मानाने घेतले जाते.

धवणे यांचे नाव मुनगंटीवारांशी जोडले जात असल्याने या प्रकरणावरून विरोधक मुनगंटीवार यांना घेरण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. यामुळे सुधीर मुनगंटीवार या प्रकरणावर काय बोलतात? याकडे लक्ष लागले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version