मुंबईकरांना वीज दरवाढीचा झटका

मुंबईकरांना वीज दरवाढीचा झटका

मुंबईकरांना भर उन्हाळ्यात वीज दरवाढीचा झटकाही सहन करावा लागणार असल्याचे दिसत आहे. कारण, अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड आणि टाटा पॉवर कंपनी या दोन प्रमुख वीज पुरवठादारांनी महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे एप्रिल महिन्यापासून दरवाढ प्रस्तावित केली आहे.

या दोन्ही कंपन्यांनी २०२३ ते २०२५ या दोन वर्षांसाठी वीज वाढीची याचिका दाखल केली आहे. यामध्ये घरगुती ग्राहकांच्या वीज टक्का वाढ करण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे मुंबईकरांच्या वीज बिलात जवळपास ५० रुपयांची वाढ होणार आहे. या याचिकेवर पुढील महिन्यात सुनावणी होणार आहे. यानंतर मार्च महिन्यात दरवाढ लागू होऊन एप्रिल महिन्यापासून ग्राहकांना नव्या दरानुसार वीजबिल मिळू शकते.

तर दुसरीकडे दुकाने, कार्यालये आणि इतर व्यावसायिक आस्थापना यांच्यासाठी वीज दरात कपात करण्याचा प्रस्ताव बेस्टने सादर केला आहे. या ग्राहकांच्या वीज दरात 6 टक्क्यांनी कपात करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. हाऊसिंग सोसायट्यांमधील इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनसाठी बेस्ट प्रशासनाकडून 16 टक्क्यांनी वीज शुल्कात कपात करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

अदानी इलेक्ट्रिसिटीने निवासी ग्राहकांसाठी एप्रिलपासून वीज दरात २-७ टक्के आणि कमी श्रेणीच्या ग्राहकांसाठी टाटा पॉवरने १०-३० टक्के आणि उच्च श्रेणीतील ग्राहकांसाठी ६-७ टक्के दरवाढ प्रस्ताविक केली आहे. सध्याचा सरासरी वीज पुरवठ्याचा दर ७.२७ रुपये प्रति युनिट आहे. या दरात आणखी वाढ होण्याची चिन्हं आहेत. कोळशाच्या वाढत्या किंमतीमुळेही वीज दरवाढ होण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version