मुंबई : महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने राज्यात भाजपाला प्रचारात मदत करणार असल्याचे जाहीर केले आहे. मुंबईत विधानसभेसाठी भाजपाला संघाची साथ मिळणार आहे. राजधानी मुंबईत विधानसभेच्या ३६ जागा आहेत. या जागांसाठी संघाचा पाठिंबा मिळणार असल्यामुळे भाजपाच्या आत्मविश्वासात वाढ झाल्याचे चित्र आहे. संघ आणि भाजपा आमदारांच्या बैठकीत रणनीती ठरली आहे. संघाच्या हिंदुत्वाच्या अजेंड्यावरच भाजप मुंबईत लढणार आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ – मतदान २१ ऑक्टोबर आणि मतमोजणी २४ ऑक्टोबर
मुंबई उपनगर – विधानसभा मतदारसंघ
मुंबई शहर – विधानसभा मतदारसंघ
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.