राज्यात उन्हाचा कडाका सुरु असताना मुंबई महापालिका प्रशासनाकडून भरती-ओहोटीचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. मुंबई महापालिका प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या भरती-ओहोटीच्या वेळापत्रकानुसार 16 जुलै रोजी समुद्रातील उंच लाटांमुळे मुंबईतील शहरांच्या अनेक भागात पाणी घुसण्याची शक्यता आहे. यंदाच्या पावसात अरबी समुद्रात मोठ्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईतील समुद्रात 24 वेळा भरती येणार असून साडेचार मीटर उंचीपेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे.
यावर्षीच्या पावसाळ्यात मुंबईत एकूण २४ वेळा मोठ्या भरतीचा इशारा देण्यात आला आहे, ज्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. विशेषतः जूनच्या पहिल्या आठवड्यात सलग सहा दिवस मोठी भरती येणार असल्याने परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. यावेळी जूनच्या पहिल्या आठवड्यात सलग सहा दिवस मोठी भरती असेल. त्यानुसार रविवार 14 जून, सोमवार 15 जून, मंगळवार 16 जून, बुधवार 17 जून, गुरुवार 18 जून आणि शुक्रवार 19 जून असे वेळापत्रक देण्यात आले आहे. यावेळी 16 जूनला 4.87 मीटर उंच उसळणार असून 17 जूनला 4.86 उंचीची लाट उसळणार आहे.
तर जुलै महिन्यात 15 जुलै आणि 16 जुलैचा अलर्ट देण्यात आला आहे. यावेळी 15 जुलैला 4.85 उंचीच लाट उसणार असून सर्वात मोठी लाट ही 16 जुलैला उसणार आहे. या लाटेची उंची जवळपास 4.89 मीटर असण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तावली आहे. प्रशासनाने नागरिकांना या कालावधीत अनावश्यक प्रवास टाळण्याचं आवाहन केलं आहे. समुद्रकिनारी जाणे, पर्यटन स्थळांना भेट देणे किंवा लांबच्या प्रवासाचे नियोजन करणं टाळावं, असं स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे. मुंबईकरांनी हवामान विभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षित राहणं आवश्यक आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.