मुंबई : मुंबई महापालिकेचा निकाल जरी महायुतीच्या बाजूने लागला असता तरी महापौरपदी ठाकरेंचाच उमेदवार बसणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडखोरीला उत्तरं देण्यासाठी आता ठाकरे गट आणि भाजप यांच्यात पडद्यामागे चर्चा होत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे मुंबई महापौर पदावर कोणाचा उमेदवार बसणार यावर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या युतीला बहुमत मिळालं आहे. भाजप 89 जागांसह पहिल्या क्रमांकावर आहे. तर शिवसेना शिंदे गटाला 29 जागा मिळाल्या आहेत. दोन्ही पक्षांनी मिळून बहुमताचा 114 चा आकडा पार केला आहे. पण सध्या शिवसेना शिंदे गटाच्या हॉटेल पॉलिटीक्समुळे दोन्ही पक्षात फूट पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांना मुंबईच्या ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये ठेवलं आहे. शिंदेकडून अडीच वर्षे महापौरपद मिळावं, यासाठी वाटाघाटी केल्या जात असल्याची चर्चा आहे. त्यासाठी शिंदेंकडून दबाबतंत्राचा अवलंब केला जात आहे. अशात ठाकरे गटाकडून मोठी खेळी केल्याची माहिती आहे. ठाकरे गटानं पडद्याआडून भाजपला पाठिंबा देण्यास सकारात्मकता दाखवल्याची माहिती समोर आली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.