Mumbai Local Update : पश्चिम रेल्वेवरील लोकलसेवा पूर्ववत; वसई, विरार, नालासोपारा स्थानकावर काय परिस्थिती?

आज सकाळपासून पावसाने ब्रेक घेतल्यामुळे वसई रोड आणि विरार दरम्यानची मुंबई लोकल ट्रेन सेवा आता पूर्ववत झाली आहे. आज पश्चिम रेल्वेवर लोकल सेवा विरारपर्यंत सुरू असून प्रवाशांचा मात्र खोळंबा कायम आहे.
Mumbai Local Update : पश्चिम रेल्वेवरील लोकलसेवा पूर्ववत; वसई, विरार, नालासोपारा स्थानकावर काय परिस्थिती?

आज हवामान विभागाकडून मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज पाऊस कमी असला तरी वारे वेगाने वाहतील त्यामुळे आज मुंबईसाठी दिलेला ऑरेंज अलर्ट वाऱ्यांसाठी दिला असल्याची हवामान विभागाची माहिती आहे. काल ताशी 70 ते 80 किमी वेगाने वारे वाहत होते. आज देखील जवळपास ताशी 50 किमी  वेगाने वारे वाहतील असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे वाहतूक विस्कळीत होणे आणि लोकल रेल्वे सेवेवर परिणाम झाला. काल पावसाच्या जोरदार बॅटिंगमुळे पश्चिम रेल्वेवरील नालासोपारा रेल्वेरुळ पाण्याखाली गेल्याचे पाहायला मिळाले होते.

यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक सेवा वसईपर्यंत ठप्प झाली होती. ज्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले. अशातच आज सकाळपासून पावसाने ब्रेक घेतल्यामुळे वसई रोड आणि विरार दरम्यानची मुंबई लोकल ट्रेन सेवा आता पूर्ववत झाली आहे. आज पश्चिम रेल्वेवर लोकल सेवा विरारपर्यंत सुरू असून प्रवाशांचा मात्र खोळंबा कायम आहे. नालासोपारा स्थानकात अद्यापही पावसाचे पाणी साचल्याचे चित्र असून लोकल गाड्या 30 ते 45 मिनिटांच्या विलंबाने धावत आहेत.

हेही वाचा- Nashik Rain Alert: नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी! त्र्यंबकेश्वरवर घोंगावणारे ढगफुटीचे महासंकट तूर्तास टळले; ‘या’ जिल्ह्यावर अतिवृष्टीचं संकट

ज्यामुळे वसई, विरार आणि नालासोपारा स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे डहाणू आणि विरारपर्यंतची लोकल सेवेबाबत अजूनही काहीच अपडेट्स देण्यात आलेले नाही. आज सकाळपासून ही सेवा काही प्रमाणात पूर्ववत करण्यात आली असली, तरी वसई आणि विरार दरम्यान अजूनही काही ठिकाणी पाणी साचलेले आहे. तसेच मध्य रेल्वेवरील लोकल सेवा 15 ते 20 मिनिटे उशीराने सुरु असून हार्बर रेल्वे मार्गावरील लोकल सेवा 10 ते 15 मिनिटे उशीराने सुरु आहे. 

मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे. हवामान विभागाने काही जिल्ह्यांसाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला असून, खबरदारीचा उपाय म्हणून अनेक ठिकाणी शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, रेल्वे वाहतुकीवरही पावसाचा मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version