मुंबई उच्च न्यायालयाचा अनिल देशमुखांना धक्का

मुंबई उच्च न्यायालयाचा अनिल देशमुखांना धक्का

  माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयाने धक्का दिला आहे. ईडीच्या समन्सला आव्हान देणारी अनिल देशमुखांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. तसेच अनिल देशमुखांना अटकपूर्व जामिन्यासाठी विशेष न्यायालयात जाण्याची सूचना उच्च न्यायालयाने दिली आहे.

 अनिल देशमुख यांना ईडीने चौकशीसाठी बोलवले होते. मात्र तरीही देशमुख चौकशीसाठी हजर नव्हते. त्यासंबंधी ईडीने त्यांना समन्ससुद्धा बजावले होते. ईडीने बजावलेल्या समन्सला देशमुखांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) समन्सला आव्हान देणारी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे अनिल देशमुखांना न्यायालयाचा मोठा धक्काच बसला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version