मुंबईतील सर्वाधीक वर्दळ असलेल्या मरीन ड्राईव्ह रोडवर आज पहाटेच्या वेळेस भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. गिरगाव चौपाटीजवळ तीन दुचाकींची एकमेकांना जोरदार धडक झाली, या धडकेत तिन्ही दुचाकींवर असलेल्या लोकांचा मृत्यू झाला. या मृतांमध्ये 60 ते 65 वर्षीय एक ज्येष्ठ नागरिक, एक तरुण आणि एका तरुणीचा समावेश आहे. या दुचाकींची धडक इतकी भीषण होती की तिन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
मरीन ड्राईव्हच्या गिरगाव चौपाटीजवळ झालेला एक स्पोर्ट्स बाईक आणि दोन स्कूटी यांच्यातील अपघात पहाटे सुमारे 5:45 वाजता घडला. या घटनेची माहिती मिळताच मरीन ड्राईव्ह पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तिन्ही मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपासणीसाठी पाठवले आहेत. हा अपघात ओव्हरस्पीडमुळे झाला की अन्य काही तांत्रिक कारणांमुळे, याचा तपास सध्या सुरू आहे. याप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.