लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता २९ सप्टेंबरपासून मिळणार

'मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण' योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे लाभार्थ्यांना २९ सप्टेंबर पासून 'डीबीटी'द्वारे थेट बँक खात्यात हस्तांतरित करण्यात येणार
लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता २९ सप्टेंबरपासून मिळणार

मुंबई : महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी महायुती सरकारने सुरू केलेल्या 'मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण' योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे लाभार्थ्यांना २९ सप्टेंबर पासून 'डीबीटी'द्वारे थेट बँक खात्यात हस्तांतरित करण्यात येणार आहेत, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. या निमित्ताने रविवार २९ सप्टेंबर रोजी राज्यातल्या रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात 'मुख्यमंत्री – माझी लाडकी बहिण' योजनेचा  राज्यस्तरीय कार्यक्रम होणार आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version