राऊतांनी उधार घेतली फुटाणेंची चारोळी

राऊतांनी उधार घेतली फुटाणेंची चारोळी

  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मलिकांविरोधात केलेल्या ट्विटमध्ये ‘फार पूर्वी मी शिकलो होतो, डुकराशी कधीही कुस्ती खेळू नका. त्यामुळे आपल्या अंगावर घाण उडते, याउलट डुकराला मजा येते’, असे म्हटले होते. यावर फडणवीसांना प्रत्युत्तर देताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ज्येष्ठ साहित्यिक रामदास फुटाणे यांच्या चिखल कवितेतील ओळी शेअर करत फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

 ‘चिखलात लोळण्याचा कार्यक्रम वक्तशीर झाला, बर्नार्ड शॉ वाचण्यासाठी दोघांनाही उशीर झाला’. या कवी आणि वात्राटिकाकार रामदास फुटाणेंच्या कवितेच्या ओळी ट्विट करुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांच्या डुकराच्या ट्विटवर भाष्य केले आहे.

  संजय राऊत म्हणाले, ‘चिखलात कोण लोळतेय, चिखलफेक कोण करतेय आणि त्याची सुरुवात कुठून झाली हे राज्यातील जनता पूर्णपणे जाणते आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवाब मलिक यांच्या पाठिशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. शेवटी सत्याचाच विजय होतो’, असे ते म्हणाले. तसेच महाराष्ट्रासमोर अनेक प्रश्न उभे आहेत त्यावर लक्ष दिले पाहिजे. त्यामुळे महाराष्ट्रात सुरू असलेले राजकीय वाद कुठेतरी थांबले पाहिजे, असे शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version