Omraje Nimbalkar First Reaction : "…त्यानंतर माझी भूमिका जाहीर करणार" ओमराजे निंबाळकर शिंदेंनाही ‘धप्पा’ देण्याच्या तयारीत?

'ऑपरेशन टायगर'च्या सर्व घडामोडींवर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली. 
Omraje Nimbalkar First Reaction : "…त्यानंतर माझी भूमिका जाहीर करणार" ओमराजे निंबाळकर शिंदेंनाही ‘धप्पा’ देण्याच्या तयारीत?

'ऑपरेशन टायगर' यशस्वी ठरल्यानंतर राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. ठाकरे गटातील 6 बंडखोर खासदारांच्या यादीत धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि ईशान्य मुंबईचे खासदार संजय दीना पाटील यांचे देखील नाव आहे. मात्र संजय दीना पाटील आणि ओमराजे निंबाळकरा यांची यांनी पाठिंब्याच्या पत्रावर सही केली नव्हती. सही करण्यापूर्वी त्यांनी भाजपकडून आश्वासन मागितलं होत की, 2029 ला होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत त्यांनाच तिकीट मिळावं.

हेही वाचा- Sanjay Raut On Operation Tiger : "स्वतःला बाजारात उभं केलं, त्यांना जायचं कारण नव्हतं" ओमराजे निंबाळकर आणि संजय दीना पाटील यांच्यावर राऊतांची सडकून टीका

यासर्व घडामोडींमुळे संजय दिना पाटील आणि ओमराजे निंबाळकर हे ठाकरेंच्या बैठकीला दोन्ही खासदार हजेरी लावतील अशी अपेक्षा होती. मात्र दोन्ही खासदारांनी संसदीय बैठकीला दांडी मारून शिवसेना पक्षनेतृत्वाला थेट संदेश दिला आहे. व्हीप जारी करूनही तब्बल 6 प्रमुख खासदारांनी या बैठकीला दांडी मारल्याने पक्षात मोठी फूट पडल्याच्या चर्चेला बळ मिळाले आहे. यानंतर शिवसेना ठाकरे गटातील खासदारांच्या संभाव्य बंडखोरीच्या आणि 'ऑपरेशन टायगर'च्या सर्व घडामोडींवर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली. 

त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे नवा पेच निर्माण झाला आहे. ओमराजे निंबाळकर आपली प्रतिक्रिया देत म्हणाले की, "मी गेल्या 3 दिवसांपासून मुंबईत नसून पुण्यातच आहे. माझ्या वडिलांच्या (पवनराजे निंबाळकर) केसचा निकाल माझ्यासाठी या घडीला सर्वात महत्त्वाचा आहे. या केसचा निकाल 20 जून रोजी लागणार आहे. 20 जूनचा निकाल लागल्यानंतर दोन दिवसांनी मी थेट माझ्या मतदारसंघात जाईन. तेथील मतदार आणि कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा करेन आणि त्यानंतरच माझी पुढील राजकीय भूमिका जाहीर करेन." 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version