टी-20 क्रिकेटने गेल्या काही वर्षात क्रिकेट चाहत्यांच्या मनात घर केलंय. इंटरनॅशनल टी-20 क्रिकेटला 2006 पासून सुरुवात झाली.
टेस्ट क्रिकेट जरी क्रिकेटचा आत्मा असला तरी टी-20 क्रिकेट अनेक जण आवर्जून आणि सवडीने पाहतात.
भारतात टी-20 फॉर्मेट खऱ्या अर्थाने प्रसिद्ध झाला तो 2007 साली.
टीम इंडियाने 2007 साली पाकिस्तानला फायनलमध्ये पराभूत करुन टी-20 वर्ल्ड कप जिंकला होता.
अवघ्या 120 बॉलच्या या प्रकारामध्ये वादळी खेळी पाहायला मिळते. या प्रकारात सहसा वैयक्तिक शतकी खेळी होत नाही.
त्यामुळे टी-20 मध्ये शतकी कामगिरी करणं मानाचं समजलं जातं.
टी-20 मध्ये टेस्ट आणि वनडेच्या तुलनेत कमी शतकी खेळ्या पाहायला मिळतात.
असे असले तरी काही खेळाडूंनी टी-20 मध्येही दोन किंवा त्यापेक्षा शतकं लगावण्याची कामगिरी केली आहे.
टी-20 मध्ये सर्वाधिक शतकं करण्याची कामगिरी रोहित शर्माच्या नावावर आहेत. रोहितने टी-20 मध्ये 4 वेळा शतकी कामगिरी केली आहे.
रोहित शर्मा – 4 शतकं
टी-20 मध्ये सर्वाधिक शतकं लगावण्याचा रेकॉर्ड हिटमॅन रोहित शर्माच्या नावावर आहे.
हिटमॅन रोहितने आतापर्यंत सर्वाधिक म्हणजेच 4 टी-20 शतकं लगावली आहेत. रोहितने टी-20 मध्ये 2007 ला एंट्री केली होती.
रोहित आतापर्यंत टी-20 मध्ये एकूण 104 मॅच खेळला आहे. यात त्याने 2633 रन्स केल्या आहेत. टी-20 मधील रोहितची 118 ही सर्वोच्च धावसंख्या आहे.
ग्लेन मॅक्सवेल – 3 शतकं
ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल वादळी खेळीसाठी ओळखला जातो. मॅक्सवेलने टी-20 मध्ये 2012 ला पदार्पण केले.
मॅक्सवेलला टी-20 स्पेशालिस्ट म्हणून ओळखले जाते. मॅक्सवेलने टी-20मध्ये आतापर्यंत 3 शतकं ठोकली आहेत.
कॉलीन मुनरो – 3 शतक
टीम न्यूझीलंडकडे कॉलीन मुनरोसारखा धडाकेबाज खेळाडू आहे. मुनरोने गेल्या काही वर्षांमध्ये दमदार कामगिरी केली.
कॉलीन मुनरोने 2012 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 पदार्पण केलं होतं.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.