राज्यात मान्सूनचे आगमन लवकरच

राज्यात मान्सूनचे आगमन लवकरच

अरबी समुद्रात बाष्पयुक्त वारे तयार होण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे राज्यात लवकरच मान्सूनचे संकेत मिळाले आहे. कोकणात २७ मे ला मान्सूनपूर्व पावसाचे संकेत हवामान विभागाने दिले आहे.सध्या सुरु असलेली उष्णतेच्या लाटेपासून अजून दिलासा नाही. उर्वरित महाराष्ट्रात उष्णतेची लाट कायम राहणार आहे. परंतु लवकरच मान्सून आगमन होणार असल्याची चाहुल लागली आहे. यामुळे राज्यात वेळेवर सात जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.

स्कायमेटच्या अंदाजानुसार केरळमध्ये मान्सून ७ जूनपर्यंत पोहोचणार आहे. विषुववृत्तीय अक्षांशांमध्ये दक्षिण हिंद महासागरावर चक्रीवादळ सरकत आहे. हे वादळ कमी होण्यास जवळपास एक आठवडा लागेल. हे वादळ मान्सूनला रोखणारे आहे. परंतु सध्या मान्सून अंदमान निकोबारकडे वेगाने वाटचाल करत आहे. यामुळे भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, मान्सूनची प्रगती अशीच राहिल्या केरळमध्ये १ जूनपर्यंत दाखल होऊ शकतो.

नैऋत्य मान्सूनचे दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागरात, निकोबार बेटांवर, दक्षिण अंदमान समुद्रात आगमन झाले. आता बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात मान्सून पोहचला आहे. त्यानंतर अंदमान समुद्र, अंदमान निकोबार बेटांवर आणखी पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल निर्माण झाली आहे. पुढील ३-४ दिवसांत नैऋत्य मान्सून अंदमान समुद्र, अंदमान निकोबार बेटांवर आणखी पुढे जाणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version