महाराष्ट्रमध्ये मान्सूनचं पुनरागमन

महाराष्ट्रमध्ये मान्सूनचं पुनरागमन

मान्सून चांगलाच सक्रिय झाल्यानं राज्यातील अनेक भागांत पाऊस बरसत आहे. कोकणात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हलका ते मध्यम पाऊस पडत आहे. राज्यात पुढील आठवडाभर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर संपूर्ण कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि विदर्भाच्या काही भागांत मुसळधार होण्याचा इशारा हवामान विभागानं दिलं आहे.
उत्तर आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशाच्या किनाऱ्यालगत बंगालच्या उपसागरात हवेचे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. तर अरबी समुद्रावरून मान्सूनचे प्रवाह बळकट झाले आहेत. या दोन्ही स्थिती पोषक ठरल्यानं राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version