लोकसभेसाठी लगबग, महाराष्ट्रात मोदी विरोधक आणि समर्थकांच्या बैठका

लोकसभेसाठी लगबग, महाराष्ट्रात मोदी विरोधक आणि समर्थकांच्या बैठका

नवी दिल्ली, १ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत. पण लोकसभेच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. मुंबईत मोदी समर्थक आणि विरोधक यांच्या बैठका तसेच सभा झाल्या. याप्रसंगी बोलताना मोदी समर्थकांनी पुन्हा एकदा मोदीच जिंकतील असा विश्वास व्यक्त केला. तर मोदी विरोधकांनी सरकार घाबरल्याचा दावा केला.

राज्यातील लोकसभेच्या सर्व जागा जिंकू असा विश्वास मोदी समर्थकांनी मुंबईत झालेल्या सभेत व्यक्त केला. महाराष्ट्रात काँग्रेस लोकसभेची एकही जागा जिंकू शकणार नाही, शून्य होऊन जाईल; असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. तर देशात मित्रपरिवारवाद सुरू आहे, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला.

कुणाचा बाप मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करू शकत नाही

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार मोदी समर्थकांच्या मुंबईतील सभेत बोलले. त्यांनी कुणाचा बाप मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करू शकत नाही, असे सांगितले. विकासाच्या मुद्यावर बोला, केवळ विरोधाला विरोध म्हणून बोलण्याला अर्थ नाही; असे अजित पवार म्हणाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version