Santosh Dhuri : "अर्धा तास गप्पा, तिकीट वैगरे बाबत…" मनसेला रामराम केल्यानंतर संतोष धुरींची पहिली प्रतिक्रिया

ऐन मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर संतोष धुरी यांनी मंत्री नितेश राणे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश निश्चित केला. यानंतर संतोष धुरी यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 
Santosh Dhuri : "अर्धा तास गप्पा, तिकीट वैगरे बाबत…" मनसेला रामराम केल्यानंतर संतोष धुरींची पहिली प्रतिक्रिया

उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या संतोष धुरी यांनी भाजपची वाट धरली आहे. दादरमधील मुंबई महापालिकेतील वार्ड क्रमांक 192 हा मनसेला देण्यात आल्यामुळे वॉर्ड क्रमांक 194 शिवसेना ठाकरे गटाला देण्यात आला असून तिथे निशिकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली. वॉर्ड क्रमांक 194 साठी मनसेतून आणि संदीप देशपांडे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे संतोष धुरी हे देखील इच्छुक होते. मात्र शिवसेना ठाकरे गटाला हा वार्ड दिल्यामुळे संतोष धुरी नाखुश झाले. ऐन मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर संतोष धुरी यांनी मंत्री नितेश राणे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश निश्चित केला. यानंतर संतोष धुरी यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 

हेही वाचा- Mumbai Municipal Corporation Election 2026 : मनसेला आणखी एक धक्का! वॉर्ड क्रमांक 194 नाकारणं राज ठाकरेंना पडलं महागात ; भाजप प्रवेश कन्फॉर्म
संतोष धुरी म्हणाले की, "मी काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. माझी कदर केली… परवा मला नितेश राणे यांनी संपर्क केला. ते सिंधुदुर्गवरून माझ्यासाठी खास आले. त्यांनी भेट घेऊया असे म्हणाले त्यानुसार काल भेटले. अर्धा तास गप्पा झाल्या बर वाटलं मला भेटून. तिकीट वैगरे हा विषय नाही. पॉलिटिकल जे काही आहे दुपारी बोलेन. तुम्ही दाखल घेतली त्यासाठी मनापासून आभारी. नितेश राणे हे कोकणातले त्यामुळे बर वाटल नेहमी ते मदत देखील करायचे. माझ्याशी कोणी संपर्क साधला नाही. देशपांडे यांच्याबरोबर मैत्री नक्कीच कायम राहील त्यांनी ठेवली तर. आम्ही सगळ्याच पक्षावर आम्ही तिला करतो विरोधाला आल्यावर तिला होतेच. मनसेत प्रवेश केला तेव्हा पण अटी शर्ती नव्हत्या ठेवल्या. त्यांनी जे दिले ते घेतले. आताही ठेवल्या मी"

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version