‘पुण्यातल्या सर्व जागा लढवणार’

मनसे पुण्यातील विधानसभेच्या सर्व जागा लढवण्याचा विचार करत आहे.
‘पुण्यातल्या सर्व जागा लढवणार’

पुणे : मनसे पुण्यातील विधानसभेच्या सर्व जागा लढवण्याचा विचार करत आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना पुणे शहरातील विधानसभेच्या सर्व म्हणजेच आठ जागा लढवण्याठी तयारी सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. याआधी राज यांनी राज्यातील मनसे पदाधिकाऱ्यांचा मेळावा मुंबईत घेतला. या मेळाव्यात बोलताना राज यांनी महाराष्ट्रातील विधानसभेच्या २०० ते २५० जागा लढवण्याची तयारी करण्याचे निर्देश दिले. यानंतरच्या पुण्याच्या दौऱ्यात राज यांनी शहरातील विधानसभेच्या सर्व जागा लढवण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे विरोधकांपुढे आणखी एक आव्हान उभे राहणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version