पाकिस्तानी आणि बांग्लादेशी घुसखोरांविरोधात मनसेने 9 फेब्रुवारी रोजी मोर्चा आयोजित केला आहे. या मोर्चापूर्वी मनसेने पोस्टरबाजी सुरू केली असून थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेरच पोस्टर लावून मनसेने मुख्यमंत्र्यांना आवाहन केलं आहे.
अखिल चित्रे यांनी ‘मातोश्री’ या उद्धव ठाकरे यांच्या घराबाहेर पोस्टर लावलं आहे.
‘माननीय मुख्यमंत्री साहेब, पाकिस्तानी आणि बांग्लादेशी घुसखोरांना हिंदुस्थानातून हाकललंच पाहिजे, हिच आपली भूमिका असेल तर प्रथम वांद्र्यातील अंगणात घुसखोरांनी भरलेले मोहल्ले साफ करा.’ असं या पोस्टरवर लिहिलं आहे.
9 फेब्रुवारी रोजी मनसेचा मुंबईत मोर्चा निघणार आहे. भायखळ्याच्या जिजामाता उद्यानापासून ते आझाद मैदानापर्यंत हा मोर्चा काढणार आहेत. मोहम्मद अली रोडवरून हा मोर्चा नेण्यासाटी मनसे पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तालयाला भेट दिली. मात्र अद्याप निर्णय झाला नाही.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.