अमित ठाकरेंच्या हस्ते रोजगार मेळाव्याचे उद्घाटन

रविवारी, मनसे नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले होते. या मेळाव्याचे आयोजन मुंबईतील मालाड पूर्व येथील बुवा साळवी मैदान, कुरार येथे करण्यात आले होते.
अमित ठाकरेंच्या हस्ते रोजगार मेळाव्याचे उद्घाटन

मुंबई: रविवारी, मनसे यांच्या वतीने रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याचे आयोजन मुंबईतील मालाड पूर्व येथील बुवा साळवी मैदान, कुरार येथे करण्यात आले होते. मनसे नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले होते.

विविध नामवंत कंपन्यांचा सहभाग:

या रोजगार मेळाव्याला तरुणांचा उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळाला. या मेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे जॉब कार्डचे वितरण. मनसे नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते जॉब कार्ड वाटप करण्यात आले होते. या कार्ड्सद्वारे तरुणांना पुढील सहा महिन्यांसाठी विविध प्रकारच्या नोकऱ्या मिळतील. या रोजगार मेळाव्यादरम्यान, युवा हब स्किल मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक किरण राहणे आणि दीपक पवार यांच्या माध्यमातून 50 ते 60 कंपन्यांनी सहभाग नोंदवला होता. अंबुजा सिमेंट, महिंद्रा, ऍक्सिस बँक, डी मार्ट, कोटक, आयसीआयसीआय, झेप्टो लिंक, फ्लिपकार्ट, स्विगी, मार्क्सन केअर, हिताची यासारख्या विविध नामवंत कंपन्या सहभागी होत्या.

हेही वाचा: नाना पटोलेंचा सरकारवर हल्लाबोल; शेतकऱ्यांचे कर्ज माफ करवुन घेतल्याशिवाय शांत बसणार नाही

तरुणांचा उत्साहपूर्ण प्रतिसाद:

या मेळाव्यासाठी 3150 ऑनलाइन युवकांनी आपली नोंदणी पूर्ण केली होती. यादरम्यान, 1450 तरुणांनी प्रत्यक्ष मुलाखत प्रक्रिया पूर्ण केली. या मुलाखतींमधून 640 तरुणांना नियुक्तीपत्र देण्यात आले आणि 560 व्यक्तींना कंपनीत सेकंड इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात आले आहे. तसेच, या रोजगार मेळाव्यात 325 तरुणांना जॉब कार्ड देण्यात आले. या मेळाव्याची विशेष बाब म्हणजे एका दिव्यांग तरुणाला दीड लाख रुपये पगाराची नोकरी देण्यात आली. त्यासोबतच, आयटी क्षेत्रात डॉट नेट डेव्हलपर म्हणून 4 लाख किमतीचे पॅकेज एका विद्यार्थ्याला देण्यात आले होते.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version