टिपू नामांतरणाच्या वादात मनसेची उडी

टिपू नामांतरणाच्या वादात मनसेची उडी

मुंबईतील मालाड परिसरातील बांधण्यात आलेल्या क्रिडांगणाच्या नामकरणावरून राजकारण तापले आहे. क्रिडांगणाला म्हैसूरचे राजे टिपू सुलतान यांचे नाव देण्यास हिंदुत्ववादी संघटना आणि भाजपने विरोध दर्शवत आंदोलन केले आहे. याच वादात आता मनसेने उडी मारली आहे.

मनसेचे नेते संतोष धुरी यांनी ट्विट करत टिपू नामांतरणावर निशाणा साधला आहे. पेंग्विनचे नामकरण केले. आता पक्षाचे पण नामकरण टीपुसेना करा. विचार तर बदलेले आहेतच, आता भगव्या झेंड्या ऐवजी हिरवा झेंडा हातात घ्या, असे ट्विट करत सामान्यांची भावना संतोष धुरी यांनी व्यक्त केली आहे.

मालाडचे काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांनी स्वनिधीतून खेळासाठी मैदान बांधले. या क्रिडांगणाचे नाव टिपू सुलतान असे देण्यात आले. तर या क्रिडांगणाला शिवसेनेकडून राणी लक्ष्मीबाई नाव देण्याची मागणी करण्यात आली होती. तर क्रिडांगणाच्या टिपू सुलतान नावाला हिंदुत्ववादी संघटना आणि भाजपाने विरोध दर्शवित आंदोलन केले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version