बंडखोर आमदार आज गोव्यात?

बंडखोर आमदार आज गोव्यात?

बुधवारी खाजगी विमानाने एकनाथ शिंदेंसह आमदार संध्याकाळी ४.३० वाजताच्या दरम्यान गोव्यात पोहोचतील.अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. एकनाथ शिंदे सह ५१ आमदार हे गोव्यामध्ये ‘ताज कन्वेंशन’ या हॉटेलमध्ये थांबतील आणि गुरुवारी सकाळी मुंबईला पोहचतील.अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार बंडखोर आमदार आज गोव्याला रवाना होणार आहेत. मिळालेल्या माहिती नुसार गोव्यातील ‘ताज कन्वेंशन’ या हॉटेलमध्ये ७१ खोल्या राखीव करण्यात आलेल्या आहेत.यानंतर सर्व आमदार गुरुवारी मुंबईत येणार असलायची माहिती मिळाली आहे. बंडखोर आमदारांसह एकनाथ शिंदे बहुमत चाचणीसाठी मुंबईत हजर राहतील.

गुवाहाटीतील हॉटेल मधून बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांनी बुधवारी सकाळी कामाख्या देवीच्या मंदिराचं दर्शन घेतले. आशीर्वाद घेण्यासाठी कामाख्या मंदिरात गेले होते. पहिल्यांदाच आमदार दोन मोठ्या बसेसमधून हॉटेलमधून बाहेर पडले.शिंदे यांनी मंदिराबाहेर पत्रकारांशी बोलताना सांगितले की, महाराष्ट्राच्या सुख-समृद्धीसाठी मी कामाख्या मंदिरात गेलो होतो. त्यासाठी मी कामाख्या मातेचा आशीर्वाद मागितला आहे.त्यामुळे ते नेमके कुठे जात आहे याबाबत चांगलीच चर्चा रंगली होती.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version