Rohit Pawar On Sanjay Gaikwad : आंबी वादात उतरले आमदार रोहित पवार, गाठले कोल्हापुरातले पोलीस ठाणे

शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी आमदार रोहित पवारांनी केली.
Rohit Pawar On Sanjay Gaikwad : आंबी वादात उतरले आमदार रोहित पवार, गाठले कोल्हापुरातले पोलीस ठाणे

कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी तब्बल 37 वर्षांपूर्वी लिहलेल्या ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाच्या शीर्षकावरुन प्रकाशक प्रशांत आंबी यांना शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी देणारे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.  याविरोधात प्रशांत आंबी यांनी कोल्हापूरच्या राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र, पोलिसांनी तुर्तास आमदार असलेल्या संजय गायकवाड यांच्यावर तातडीने गुन्हा नोंदवून घेण्यास नकार दिला. या प्रकरणात आता शिवाजी कोण होता? पुस्तकाच्या प्रकाशक धमकी प्रकरणात होणार आमदार रोहित पवार यांची एंन्ट्री झाली आहे. शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी आमदार रोहित पवारांनी केली. या प्रकरणावरून रोहित पवारांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात ठाण मांडला. त्यानंतर अखेर पोलिसांनी FIR दाखल करुन घेण्याचं आश्वासन दिलं.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version