आमदार नाराज, मविआ तणावात

आमदार नाराज, मविआ तणावात

राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकारण चांगलच तापलं आहे. तर दुसरीकडे बहुजन विकास आघाडी आणि समाजवादी पार्टीचे आमदार मविआवर नाराज असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. बविआ आणि सपाचे पाच आमदार मविआवर नाराज असल्यामुळे मविआत तणाव निर्माण झाला आहे. तसेच राज्यसभा निवडणुकींबाबत योग्यवेळी भूमिका ठरवू, अशी घोषणा बहुजन विकास आघाडीने केली आहे. त्यामुळे बहुजन विकास आघाडीचा महाविकास आघाडीला धक्का? असा सवाल आता उपस्थित होत आहे.

आमदारांच्या नाराजीची कारणे काय?

महाविकास आघाडी सरकार बहुजन विकास आघाडीला किंमत देत नाही. मविआकडून समाजवादी पार्टीच्या खच्चीकरणाचे प्रयत्न होत आहेत. तसेच मविआचे नेतृत्व अपक्षांना भेटत नसल्यामुळे बविआ आणि सपाचे आमदार मविआवर नाराज आहेत. दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत अपक्षांना घोडा ठरवतात तर मविआमध्ये अपक्ष आमदारांना सन्मान मिळत नसल्याचा आरोपही बविआ आणि सपाच्या नाराज आमदारांनी केला आहे. त्यामुळे या आता मविआत तणाव निर्माण झाला असून मविआला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कोण आमदार मविआवर नाराज?

  • हितेंद्र ठाकूर, आमदार, बविआ
  • क्षितिज ठाकूर, आमदार, बविआ
  • अबू असीम आझमी, आमदार, सपा
  • रईस शेख, आमदार, सपा
  • किशोर जोरगेवार, अपक्ष आमदार

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी जागा सहा आणि उमेदवार सात आहेत. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले असून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. येत्या १० जून रोजी राज्यसभा निवडणुका पार पडणार आहेत. त्यामुळे आता कोणते अपक्ष आमदार मविआच्या बाजूने उभे राहतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version