आज राज्यभरात मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं मराठी भाषा गौरव दिन सादरा करण्यात येतो. या याच खास दिवसाचं औचित्य साधून आज म्हणजे 27 फेब्रुवारी 2026 रोजी, काही खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं.
राज्य शासनाच्या वतीनं विधीमंडळात आयोजित करण्यात आलेल्या मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमाला मात्र आमदारांची दांडी पाहायला मिळाली. या सगळ्या प्रकारामुळे आपल्याच मराठी माणसांमध्ये मराठी भाषेबद्दल आनास्था आहे का? असा प्रश्न उभा राहिला आहे.
विधीमंडळात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सर्वपक्षीय आमदारांना कार्यक्रमांचं आमंत्रण असतानाही 90 टक्क्यांहून अधिक आमदार कार्यक्रमासाठी गैरहजर असल्याचं दिसून आलं. तसेच या कार्यक्रमाला केवळ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि प्रमुख मंत्री यांची उपस्थिती वगळता आमदारांची अनुपस्थिती होती.
विधीमंडळामध्ये सर्व आमदारांनी हजर असणे अनिवार्य असते. मात्र मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमाला अनेक आमदार अनुपस्थित असल्याने अनेक प्रश्न उपस्थित राहत आहेत. त्याचप्रमाणे ज्या मराठी भाषेच्या मुद्द्यावरून राजकारण केलं, ज्या मराठीवरून मतं मागण्यात आली त्याच मराठी भाषेच्या गौरव दिनी आमदारांची ही अनुपस्थिती अनेकांना पटलेली नाही.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.