Chandrakant Patil On Gautami Patil : ‘गुन्हा दाखल करा…’, गौतमी पाटील कार अपघातप्रकरणात चंद्रकात पाटीलांची उडी

गौतमी पाटील सध्या चर्चेत आहे. 30 सप्टेंबर रोजी पुण्यातील वडगाव बुद्रूक येथे गौतमी पाटीलच्या कारने एका रिक्षाला धडक दिली. या घटनेत रिक्षाचालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
Chandrakant Patil On Gautami Patil : ‘गुन्हा दाखल करा…’, गौतमी पाटील कार अपघातप्रकरणात चंद्रकात पाटीलांची उडी

कोल्हापूर: गौतमी पाटील सध्या चर्चेत आहे. 30 सप्टेंबर रोजी पुण्यातील वडगाव बुद्रूक येथे गौतमी पाटीलच्या कारने एका रिक्षाला धडक दिली. या घटनेत रिक्षाचालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. रिक्षाला धडक दिल्याप्रकरणी एकीकडे पोलिसांनी गौतमी पाटीलच्या कारचालकाला ताब्यात घेतल्याचे सांगितले जात आहे, तर दुसरीकडे रिक्षाचालकाच्या कुटुंबीयांनी गौतमी पाटीलला अटक करण्याची मागणी केल्याची बातमी समोर आली आहे. 

रिक्षाला धडक दिल्याप्रकरणी गौतमी पाटीलवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी रिक्षाचालकाच्या कुटुंबीयांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली. याप्रकरणी, चंद्रकांत पाटील यांनी वक्तव्य केले. 'सायंकाळी मी माझ्या आमदार कार्यालयात बसलो होतो. यादरम्यान, रिक्षाचालकाची मुलगी माझ्याकडे आली आणि रडू लागली. मग मी विचारले की डीसीपी कोण आहे? डीसीपींना फोन लावा. यानंतर, मी डीसीपींना सांगितले की गौतमी पाटील असो किंवा इतर कोणी. तुम्ही गुन्हा दाखल करा. मात्र, डीसीपी म्हणाले की, गौतमी पाटील म्हणत आहे की जेव्हा ही घटना घडली तेव्हा मी गाडीत नव्हते, मात्र गाडी माझीच आहे. तसेच, रिक्षाचालकाचा खर्च मी देईन'. 

हेही वाचा: Anil Parab On Ramdas Kadam : 'कदमांच्या पत्नीने स्वत:ला जाळून घेतले?'; रामदास कदमांच्या दाव्यानंतर अनिल परबांनी केले गंभीर आरोप

यादरम्यान, आमदार रोहित पवारांनी मंंत्री चंद्रकात पाटील यांच्यावर टीका केली. यावर, मंत्री चंद्रकात पाटील यांनी रोहित पवारांवर निशाणा साधला. चंद्रकात पाटील म्हणाले की, 'रोहित पवारांना काही कामधंदा आहे की नाही? लगेच रोहित पवार नेता होऊ लागला. मला रोहित पवारांनी शिकवावं अशी वेळ आली आहे. निलेश घायवळ विषयामध्ये मी काय केले हे मी येथे जाहीरपणे सांगू का? घायवळ विरोधात लुकाऊट नोटीस विनाकारण निघाली का? प्रत्येक प्रकरणात यांना ढोल वाजवण्याची सवय आहे, आम्हाला नाही'. दरम्यान, याप्रकरणी पुणे पोलिसांची काय भूमिका असेल? याकडे सर्वांचे लक्ष आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version