मंत्री अनिल पाटलांची इरशाळवाडी दरडग्रस्तांना भेट.

मंत्री अनिल पाटलांची इरशाळवाडी दरडग्रस्तांना भेट.

राज्यात सर्वच जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे, अनेक ठिकाणी दऱ्या कोसळणे, महापूर येणे अशा घटना घडत आहेत, त्यातच इरशाळवाडी येथील कोसळलेल्या दरडीत अपघात ग्रस्तांना राज्याचे मदत व पुनर्विकास मंत्री अनिल पाटील यांनी गुरुवारी अपघातग्रस्तांचा तात्पुरत्या निवारा केंद्राला भेट दिली.

तेथील पिडितांशी चर्चा करून त्यांना भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेतल्या. तिथं सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. त्यानंतर पीडितांच्या कायम स्वरुपी पुनर्वसन करण्यासंदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा केली. पुनर्वसन कामात ज्या ज्या विभागांची गरज आहे त्या सर्व विभागांना कामांचे प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना केल्या. पीडितांचे लवकरात लवकर पुनर्वसन करण्यात येईल असे अनिल पाटील यांनी सांगितले.

त्याच बरोबर ज्या व्यक्ती बेपत्ता आहे त्यांना मृत घोषित करून, त्यांच्या कुटुंबियांना योग्य ती मदत मदत करू अशी घोषणाही अनिल पाटील यांनी केली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version