एमआयएमची कार रॅली मुंबईच्या दिशेने

एमआयएमची कार रॅली मुंबईच्या दिशेने

अटी-शर्तींसह एमआयएमची कार रॅली मुंबईच्या दिशेने येणार आहे. मात्र ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर पोलीस मुंबईत रॅलीला रोखण्यात येणार आहेत. मुस्लिम आरक्षणासाठी ओवेसी यांच्या उपस्थितीत मुंबईत रॅली काढण्यात येणार आहे. मात्र मुंबई पोलिसांनी जमावबंदीचे आदेश लागू केल्यानंतर कार्यकर्त्यांना मुंबईच्या बाहेरच रोखण्यात येणार आहे.

मुंबईच्या दिशेने औरंगाबादहून एमआयएमचे कार्यकर्ते गाड्या घेऊन रवाना झाले आहेत. मुस्लिमांना आरक्षण मिळण्याची एमआयएमची मागणी आहे. खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली एमआयएमकडून मुंबईच्या दिशेने रॅली निघाली आहे. मात्र मुंबईत जमावबंदी लावण्यात आली आहे. मुंबईत मोर्चा, रॅलीवर पोलिसांकडू बंदी घालण्यात आली आहे. मात्र एमआयएम रॅली काढण्यावर ठाम आहेत. ३०० गाड्यांचा ताफा मुंबईकडे रवाना झाल्या आहेत.

मुंबईत रॅलीला परवानगी नाकारली आहे. दोन वेळा अडवल्यानंतर अटी-शर्तींसह एमआयएमची कार रॅली काढण्यात आली आहे. रॅली मुंबईच्या दिशेने निघालू असून मुंबईत मात्र प्रवेश निषिद्ध करण्यात आला आहे.

रॅलिसाठी मुंबईला निघालेल्या एमआयएमच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी मालेगावात स्थानबद्ध केले. मालेगावात ५०हून अधिक कार्यकर्त्यांना स्थानबद्ध केल्यामुळे कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन केले. त्यामुळे तेथे तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version