एमएचटी सीईटीचा निकाल जाहीर

एमएचटी सीईटीचा निकाल जाहीर

पीसीएम (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित) आणि पीसीबी (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र) गटांसाठी एमएचटी सीईटीचा २०२३ निकाल सोमवार रोजी सकाळी ११ वाजता cetcell.mahacet.org वर जाहीर करण्यात आला. महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा (CET) २०२३ साठी बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइटवरून त्यांचे निकाल तपासून आणि डाउनलोड करू शकतील. ९ मे ते २० मे २०२३ या दरम्यान अभियांत्रिकी, कृषी आणि फार्मसीमध्ये पदवीपूर्व अभ्यासक्रम करण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांसाठी MHT-CET परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत 6.36 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती.

पीसीएम गट परीक्षा ९ मे २०२३ ते १४ मे २०२३ आणि पीसीबी गट परीक्षा १५ मे २०२३ ते २० मे २०२३ या कालावधीत घेण्यात आली. नोंदणीकृत उमेदवारांपैकी, पात्र ५,९१,१३० विद्यार्थी परीक्षेला बसले, परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या टक्केवारी ९२.९३ % इतकी प्रभावी ठरली. एमएचटी सीईटी परीक्षेत राज्यातील २८ विद्यार्थ्यांनी १०० पर्सेंटाईल गुण मिळवले आहेत.गेल्यावर्षी २०२२ मध्ये एमएचटी सीईटीसाठी एकूण ६ लाख ०४ हजार ७८० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

भौतिकशास्त्र रसायनशास्त्र, गणित म्हणजे पीसीएम आणि भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र अर्थात पीसीबी या दोन्ही विषयांसाच्या ग्रुपचे निकाल जाहीर झाले आहेत. एमएचटी सीईटीचा निकाल cetcell.mahacet.org आणि mhtcet2021.mahacet.org या दोन अधिकृत संकेतस्थळांवर पाहता येईल. तुम्ही दोन्हीपैकी कोणत्याही वेबसाईटला भेट देऊन तुमचा निकाल पाहू शकता.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version