मेक्सिकोमधील भीषण अपघात

मेक्सिकोमधील भीषण अपघात

मेक्सिको: मेक्सिको सिटीमध्ये मेट्रोचा एक पूल कोसळला असून मोठा अपघात झाला आहे. दुर्घटना घडली तेव्हा मेट्रो ट्रेन पुलावरुन जात होती. या अपघातात २० जणांचा मृत्यू झाला असून ७० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. सोमवारी रात्री ही घटना घडली असून रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरु होतं.

या दुर्घटनेची माहिती मिळताच वैद्यकीय पथक आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत बचावकार्यास सुरुवात केली. दरम्यान ४९ लोक जखमी असून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

परराष्ट्रमंत्री मार्सेलो एबरार्ड मेक्सिको सिटीचे महापौर असताना या मेट्रोच्या लाईनचं काम करण्यात आलं होतं. ट्विट करत त्यांनी ही अत्यंत भीषण दुर्घटना असल्याचं सांगत पीडितांच्या कुटुंबासाठी शोक व्यक्त केला आहे. दरम्यान या दुर्घटनेची चौकशी केली जाणार असून दोषींवर कारवाई केली जाईल असंही ते म्हणाले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version