रेल्वेचा रविवारी मेगाब्लॉक

मध्य रेल्वे मुख्य मार्ग आणि हार्बर मार्ग तसेच पश्चिम रेल्वे मार्गावर रविवार १७ नोव्हेंबर २०२४ रोजी मेगाब्लॉक आहे.
रेल्वेचा रविवारी मेगाब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वे मुख्य मार्ग आणि हार्बर मार्ग तसेच पश्चिम रेल्वे मार्गावर रविवार १७ नोव्हेंबर २०२४ रोजी मेगाब्लॉक आहे. प्रवाशांनी मेगाब्लॉकची माहिती घेऊन प्रवासाचे नियोजन करावे असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. रेल्वेच्या देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी तसेच निवडक नियोजीत कामांसाठी मेगाब्लॉक आहे.

रविवार १७ नोव्हेंबर २०२४ – रेल्वेचा मेगाब्लॉक

  1. मध्य रेल्वे मुख्य मार्ग – माटुंगा ते मुलुंड जाणाऱ्या आणि येणाऱ्या धीम्या मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ या वेळेत मेगाब्लॉक
  2. मध्य रेल्वे हार्बर मार्ग – कुर्ला ते वाशी जाणाऱ्या आणि येणाऱ्या धीम्या मार्गावर सकाळी ११.१० ते संध्याकाळी ४.१० या वेळेत मेगाब्लॉक
  3. पश्चिम रेल्वे – जोगेश्वरी ते गोरेगाव जाणाऱ्या आणि येणाऱ्या धीम्या मार्गावर तसेच हार्बरच्या जाणाऱ्या आणि येणाऱ्या धीम्या मार्गावर शनिवार १६ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्री ११.३० पासून रविवार १७ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ११.३० पर्यंत मेगाब्लॉक

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version